अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ठोठावली शिक्षा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अल्पवयीन पीडित मुलगी संध्याकाळी तिच्या घरासमोर असलेल्या बाकड्यावर बसलेली असताना शेजारील व्यक्ती तिच्या जवळ येउन तिला एका बंद घराच्या छतावर घेऊन गेला व तिला विवस्त्र करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.

काही वेळातच तिथे आरोपीची बहिण छतावर आली असतात बहिणीने त्या मुलीस धमकावून तिथून तिच्या घरी पाठवून दिली. मुलगी घाबरलेली असल्याने तिने घडलेला प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला नाही.

दुसऱ्या दिवशी देखील त्याच व्यक्तीने न घाबरता पुन्हा एकदा मुलीला घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला जीवे मारण्याची धमकी देऊन घरी पाठवून दिले. घरी गेल्यावर दोन तीन दिवसात तिचे पोट दुखू लागले डॉक्टरांकडे जाण्याचा आग्रह केल्यामुळे तिने घडलेला प्रकार आपल्या बहिणीला सांगितला.

बहिणीने आणि मुलीने नातेवाईकांच्या मदतीने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. आरोपी सय्यद तसेच त्याची बहीण मुंनी उर्फ शमीना सय्यद या दोघांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली. त्यानुसार अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अफसर लतीफ सय्यद (वय 26, रा. भराडगल्ली, नगर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एल. आणेकर

यांनी दोषीधरून 20 वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या गुन्ह्यातील दुसरी महिला आरोपी मुन्नी ऊर्फ शमिना लतीफ सय्यद हिला एक महिना साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment