मुंबई: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता जाहीर झाल्या आहेत. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी असे दोन्ही पक्ष विजयाचे दावे करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आपणच मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.
शिवाय उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिले जाऊ शकते, असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना फडणवीसांनी भाजप-शिवसेना एकत्रच लढणार असल्याचेही स्पष्ट केले.

भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपावरून काही नाराजी असल्याच्या बातम्या असल्या तरी यातून मार्ग निघाल्याचे संकेत आहेत. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्यांबाबत विचारले तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, राजकारणात काहीही अशक्य नसते.
आदित्य ठाकरे सध्या राजकारणाचे धडे घेत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात उतरायचे नाही, असा निर्णय घेतला होता. आता आदित्य यांनीही त्याच मार्गावर चालावे असे नाही. कधी ना कधी शिवसेनेचे नेतृत्व त्यांनाच करायचे आहे.’
- भारत – पाकिस्तान तणावामुळे काजू, बदामचे भाव वाढलेत ! ड्रायफ्रूटचे रेट किलोमागे ‘इतके’ वाढले, काजू बदामचे सध्याचे रेट कसे आहेत ?
- डॉ. अनिल बोरगे यांनी अपहार उघड झाल्यानंतरही पोलिसात फिर्याद देऊन गुन्हा दाखल का केला नाही ?
- बाळासाहेब थोरातांचे वक्तव्य पराभवाच्या वैफल्यातून, आमदार अमोल खताळ यांची जोरदार टीका
- अहिल्यानगरमध्ये रानडुक्कर आणि सश्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ; बिबटे, तरस आणि कोल्ह्यांचा मुक्त संचार
- SBI ची FD योजना बनवणार मालामाल ! 12 महिन्यांच्या एफडी योजनेत 1 लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?