मिडिया लॉरिस्टर पुरस्काराने सुधीर मेहता यांच्या निस्पृह पत्रकारितेचा गौरव

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- मेरे देश में मेरा अंगण या संस्थेच्या वतीने पत्रकार सुधीर मेहता यांना पुरस्कार जाहीर झाला होता हुतात्मा स्मारकात मकरंद घोडके यांनी महेश घोडके यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, पण ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता प्रकृती अस्वास्थ्य मूळे आले नसल्याचे समाज ताच संयोजकांनी एक सुखद धक्का सुधीर मेहता आणि परिवाराला दिला.

त्यांच्या निवासस्थानी सुधीर मेहता, सौ.कल्पना मेहता, सायली मेहता यांचा अतिशय भावपूर्ण सन्मान केला. नेहमी शिव्या शाप आरोपांचे धनी होणार्‍या पत्रकरासाठी हा दुर्लभ असाच सोहळा. जैन समाजाचे अध्यक्ष सुभाष शेठ मुथा यांनी सुधीर मेहता यांचा गौरव म्हणजे समाज चांगल्या कामाचा गौरव करतोच हे दिसून आले. 30-35 वर्षापासून सुधीर मेहता यांची पत्रकारिता आणि सामाजिक कार्य जवळून पाहतो..

सामान्यांच्या प्रश्‍नात ते सदैव तत्पर असतात. खर्‍या अर्थाने या पुरस्काराला न्याय मिळाला. मी बार्शीकर मित्र मंडळाचा अध्यक्ष होतो; तेव्हापासून त्यांचे काम-आंदोलने पाहतोय. आज ही नवनीतभाईं विचार मंचच्या माध्यमातून सुधीर मेहताच भाईंचा कार्यक्रम आजच्या कार्यकर्त्यांसमोर मांडताहेत. त्यांच्या कार्याचा केवळ गौरव नव्हे तर पूर्ण सहकार्य करण्याची गरज असल्याचे शब्दात सुभाष मुथा यांनी सुधीर मेहता यांच्या पत्रकारितेचा गौरव केला.

दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी सुधीर मेहता यांचा प्रामाणिकपणा नि:स्पृहता आणि जे प्रश्‍न हाती घेतले ते अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने कौशल्याने मार्गी लावले अनेक प्रश्‍न आंदोलनाचा उहापोह करून सर्वात महत्वाचं म्हणजे सुधीर मेहता यांनी कधीही मेवा नाही पाहिला सेवा म्हणजे सेवा त्यांच्यामुळे नगरच्या पत्रकारितेची प्रतिष्ठा उंचावली. मी त्यांचा संघर्ष जवळून पाहिला आहे अनेक आमिषे गरिबीची परिस्थिती असताना त्यांनी नि:स्पृहतेने लढली.

आज असे पत्रकार अपवादालाच दिसतात म्हणूनच सुधीर मेहता यांचा गौरव खूप महत्त्वाचा असल्याचं वसंत लोढा म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे याने सुधीर मेहता खर्‍या अर्थाने लोकांचे प्रश्‍न सोडवणारे लोक न्याय मित्र पत्रकार आहेत. समाज चांगल्या गोष्टींचा गौरव ही करतो हे दाखवण्यासाठी आम्ही पुरस्कार देण्यासाठी घरी आलो असे म्हणाले. अनेक प्रश्‍न, आंदोलनाचा उल्लेख करून आपलाही अनेक कार्यक्रम आंदोलनात सहभाग होता असे भंडारे म्हणाले.

सुधीर मेहता यांच्या आंदोलनावर पुस्तक काढू – कारभारी गवळी संयोजक कारभारी गवळी वकील यांनी सुधीर मेहता यांच्या रेल्वे प्रश्‍न पाहिला रेल रोको, नगर मनमाड रस्ता आंदोलन पाहिला रस्ता रोको. डी झोन एमआयडीसीची गाजलेले आंदोलनाची आठवण दिली. बोगस डॉक्टर इलेक्ट्रोपॅथी विरोधाचे अभूतपूर्व आंदोलन सुधीर मेहतांनी निर्धाराने यशस्वी केले. किती सांगणार त्यापेक्षा आपण या आंदोलनावर एक पुस्तक काढू ज्यातून आजच्या पत्रकारांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल असे गवळी म्हणाले.

मी समाधानी. देश पाहिला ..सुधीर मेहता. सुधीर मेहता या कौटुंबिक सत्कराने भारावून गेले होते. देश पाहिला, अनेक पंतप्रधान पाहिले, सर्व राज्ये अनेक मुख्यमंत्री, मंत्री, नेते यांचा सहवास मिळाला. ज्या दैनिक लोकयुग दैनिकातून नवनीतभाईनी इतिहास घडवला त्याच लोकयुगचा संपादक झालो, मालक झालो आणि आजही भाईंचा विचार पुढे नेताना मला अभिमान वाटतो.

लोकमत, गावकरी, नवभारत, हिंदी केसरी, पुण्यनगरी तर स्थानिक समाचार, नवा मराठा दैनिकातून विपुल लेखन केले. प्रेस क्लब पत्रकार संघाचा अध्यक्ष,. मराठी पत्रकार संघाचा कोषाध्यक्ष, राष्ट्रीय पत्रकार महासंघ नवी दिल्लीचा महासचिव, युवक बिरादरी सारखी संस्था, 25 वर्ष सुरू असलेला नगर महोत्सव आणि आता नगर पर्यटन अनेक उपक्रमांचे नेतृत्व करण्याची संधी मोठ्या भाग्यनगर मिळाली आणि सर्वांच्या सहकार्याने या जबाबदार्‍या पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करू शकलो.

जयंतराव टिळक, दिपक टिळक, स्व.जवाहरलाल दर्डा, विजय व राजेंद्र दर्डा, स्व.दादासाहेब पोतनिस, स्व.बाबा शिंगोटे, स्व.नवनीतभाई बार्शीकर, स्व. आचार्य गुंदेचा, स्व.गोपाळराव मिरीकर, स्व.जानुभाऊ काणे, स्व. गोवर्धनभाई बार्शीकर, स्व. विनोदभाई शाह यांचे अनमोल मार्गदर्शन जीवनात मिळाले. तर सर्वात ज्येष्ठ पत्रकार मधुकर खेडकर, श्रीपाद मिरीकार, सुकृत खांडेकर, सुभाष गुंदेचा आणि अनेक मित्रांची साथ हीच माझ्या आयुष्याची पुंजी..

मी आज खूप समाधानी आहे अनेक आंदोलने केली. माझ्या नि:स्पृहतेने माझ्या सारखा कार्यकर्ता बायपास, रिंग रोड आंदोलन, डी झोन, एमआयडीसी आंदोलन, बोगस डॉक्टरेट इलेक्ट्रॉपॅथी विरुद्ध नगर मधून समर्थपणे उभा राहिलो.

सामाजिक वनीकरण भ्रष्टाचार इलेट्रॉनिक्स मिडिया नसताना देशभर पोहचवला आणि तीन वर्ष स्वतंत्र पाठपुरावा न डगमगता संघर्ष केला. प्रचंड दबाव आल्यावर अण्णा हजारेंकडे हे प्रकरण सुपूर्द केले. आणि एकाच खात्याच्या 17 प्रमुख अधिकार्‍यांवर कारवाईक होईपर्यंत लढा दिला. आज कुणाला आठवणही येत नाही की, अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन ज्या माझ्या सामाजिक

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!