pअहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-गेल्या दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. येत्या 24 तासांत तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
तर राज्यात सगळ्यात कमी किमान तापमान 10. 5 अंश शेल्सिअस गोंदियात नोंदवण्यात आले आहे. पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया,
नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट झाली आहे. तर, यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील किमान तापमान :
- नाशिक – 10.1℃
- परभणी – 10.8°C
- पुणे – 10.4°C
- सांताक्रुझ – 18.4°C
- बारामती – 11.4°C
- औरंगाबाद – 12.2°C
- बीड – 11.9°C
- जालना – 12.3°C
- अकोला – 12.7°Cp
- नागपूर – 12.9°C
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved