आरोपी बाळ बोठे विरोधात रेखा जरे यांच्या मुलाने केले धक्कादायक खुलासे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- जातेगाव घाटात सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे. 

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात रेखा जरे यांचा मुलगा ‘रुणाल भाऊसाहेब जरे (वय-२४) याने बाळ बोठे याच्यासह त्याच्या समर्थक, हस्तकांकडून आपल्या जिवीताला धोका असल्याची भिती व्यक्त केली आहे

तसेच  आईने यापूर्वीच आरोपी बाळ बोठे याच्या विरोधात शहरातील पोलिस ‘ ठाण्यात अर्जही दिले आहेत, असे रुणाल जरे याने पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात ‘ म्हटले आहे. 

दरम्यान ह्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा आईचा शारीरिक व मानसिक छळ करायचा, असा धक्कादायक खुलासा खून झालेल्या रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने केला आहे.  

बाळ बोठे याचे आमच्या घरी नेहमीच जाणे- येणे असायचे. माझ्या आईचा त्याने अनकेदा मानसिक व शारीरीक छळ केला होता. तो तिला नेहमी जिवे मारण्याची धमकी द्यायचा. 

तुला आणि तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही, असेही तो बोलायचा. त्याची आमच्या कुटुंबावर मोठी दहशत असल्याची माहितीही रेखा जरे यांच्या मुलाने सांगितली आहे. 

मृत जरे यांच्या मुलाने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, बाळ बोठे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने व त्याने या आधीच आम्हाला संपवून टाकण्याची भाषा केली असल्याने त्याच्याकडून व त्याच्या समर्थकांकडून आमच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे. 

आमच्या सर्वाचेच काही बरेवाईट झाल्यास त्यास सर्वस्वी बाळ बोठे हाच जबाबदार असणार असल्याची नोंद आपण घ्यावी. त्याच्याकडून आमच्या जिवीताला असणारा धोका विचारात घेऊन आम्हाला तातडीने पोलिस संरक्षण मिळावे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Shocking revelations made by Rekha Jare’s son against accused Bal Bothe

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment