अकोले :- राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या पिचड-पुत्रांना आव्हान देण्यासाठी भाजपमधील अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, जि. प सदस्या सुनीता भांगरे, आदिवासी नेते अशोक भांगरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर आता पिचडांना शह देण्यासाठी एकास एक उमेदवार देण्याची तयारी अकोलेतील विविध नेत्यांनी केली. यापूर्वी मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांचेविरोधात अशोक भांगरे नेहमीच लढत होते. मात्र मतविभाजनामुळे पिचडांना नेहमीच फायदा झाला.
आता अकोलेतून डॉ. किरण लहामटे, सुनीता भांगरे, अशोक भांगरे हे तिघेही इच्छुक आहेत. मात्र आता राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते याकडे अकोलेकरांचं लक्ष लागलं आहे.
- मित्राशी बोलून बाहेर गेला तरुण ; त्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून
- आघाडी कशीही लढो,आम्हाला चिंता नाही ! विखे पाटील यांचा आत्मविश्वास ; निगेटिव्ह नॅरेट अल्पकाळ टिकले
- सौंदाळा येथील महादेव मंदिरातून मूर्त्यांची चोरी
- कुकडीचे पाणी पठारी भागावर आणा दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे विखे यांना साकडे
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजितदादा भडकले ; माध्यम प्रतिनिधींना सुनावले खडेबोल