अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे, कायद्याचे धाक न राहिल्याने अवैध धंदे देखील वाढू लागले आहे. पोलीस प्रशासनाकडून यावर कारवाईचा धडाका सुरु आहे.
अशीच एक कारवाई संगमनेर तालुक्यात करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चार हजार दोनशे रुपयांच्या रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
या कारवाईत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, शहरातील राहणे मळा येथील राणी बिल्डिंगच्या खालील पोर्चमध्ये नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला आणि त्यामध्ये सहा जण नावाचा जुगार खेळत होते.
या जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून चार हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
पोलीस नाईक सचिन सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांवर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक बीबी देशमुख करत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved