अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले शिर्डी येथील साई मंदिर अनेक दिवसानंतर उघडण्यात आल्यानंतर एका नव्या वादाने जन्म घेतला आहे.
शिर्डी मध्ये साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. यावरून मात्र चांगलाच वाद पेटला आहे.
या ड्रेसकोडच्या मुद्यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर थेट हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन काढू, असा इशाराच दिला होता. मात्र अद्याप हा बोर्ड हटवण्यात आला नाही.
त्यामुळे आम्ही १० डिसेंबरला हा बोर्ड काढण्यास येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले आहे. या पत्राची प्रत देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री,
गृहमंत्री, पोलीस महासंचालक, नगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देखील पाठवली आहे. शिर्डीतून आम्हाला अनेक धमक्या,
काळे फासण्याची भाषा अनेकांकडून येत असल्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व आमच्या जीविताचे काही बरेवाईट झाल्यास त्यास साई संस्थान जबाबदार राहील,असेही त्यांनी स्पष्ट केले असून त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved