जामखेड :- पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे व पालकमंत्री राम शिंदे यांचे पीए अशोक धेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी जाहीर प्रवेश केला. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
कर्जत येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्धार मेळाव्यात भाजपचे अनेक नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यामध्ये सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री मोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, अशोक धेंडे, अहल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे, देवदैठणचे सरपंच अनिल भोरे, भाजप किसान सेलचे अध्यक्ष संतोष कात्रजकर, कुसडगावचे ग्रामपंचायत सदस्य राम गंभिरे, भाजप वारकरी सेलचे तालुकाध्यक्ष अमृत महाराज डुचे यांचा समावेश आहे.
सभापती आव्हाड म्हणाले, मी एक रयत सेवक आहे. भाजपमध्ये येऊन माझे मोठे नुकसान झाले आहे. येथे माझी घुसमट होत होती. त्यामुळे मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.
याप्रसंगी माजी खासदार अंकुश काकडे, राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, उपस्थित होते. कर्जत येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपतील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- MSRTC : वाहतुकीचा नियम मोडला तर एसटी चालकाच्या पगारातून थेट दंड वसूल!
- पुणेकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी ! ‘या’ भागात सुद्धा तयार होणार दुमजली उड्डाणपूल, कसा असणार रूट?
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ! अहिल्यानगरच्या ह्या महिलांना १५०० ऐवजी फक्त ५०० रुपये…
- कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा : आ. रोहित पवार यांच्या पुढाकाराने सीना कालव्याचे आवर्तन सुरू होणार
- मुंबईहुन नाशिक फक्त अडीच तासात, ‘हा’ महत्वाचा एक्सप्रेस वे ठरणार गेमचेंजर