अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. राहुरी तालुक्यातील चिखलठाण गावातील बुळे पठार येथे बिबट्याने गायींवर हल्ला केला त्याच्या बचावासाठी आलेल्या दोन व्यक्तींना जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
या बिबट्याच्या हल्यात मच्छिंद्र दुधावडे, तावजी केदार हे दोघे जण जखमी झाले आहेत. घडलेली घटना अशी कि, घरासमोर असलेल्या गायींवर बिबट्याने हल्ला केला.
या हल्ल्यामुळे गायींनी हंबरडा फोडला. हा आवाज ऐकून मच्छिंद्र दुधावडे हे घराकडे आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले.
मात्र बिबट्याने मागे फिरून दुधावडे यांच्यावर हल्ला केला. त्याच्या हाताला बिबट्याने चावा घेतला मात्र त्यांनी त्यांच्या हाताची सुटका करून घेतली.
या हल्यातील जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved