अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. पिंजरा लावून जवळपास तीन ते चार दिवस उलटले आहे.
तरी देखील बिबट्या पिंजर्यात अडकला नाही. वारंवार पिंजर्याजवळून जाऊनही जेरबंद होत असल्याने वन विभागासह शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी येथे वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी बिबट्याने धुमाकूळ घालत कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे.
त्यामुळे शेतकर्यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कधी एकदाचा बिबट्या पिंजर्यात जेरबंद होईल याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.
या पार्श्वभूमीवर भयभीत झालेल्या शेतकर्यांनी पिंजरा लावण्याची वन विभागाकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वन विभागानेही तात्काळ परिसरात पिंजरा लावला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved