महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस ७२ तासात अटक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे रमेश पंदरकर यांच्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता चौकशीअंती सदर मृतदेह हा लता मधुकर शिंदे राहणार विसापूर यांचा असल्याचे निष्पन्न झाले

लता शिंदे यांच्या डोक्यावर धारदार वस्तूने मारून त्यांचा खून करण्यात आला होता आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांचे प्रेत तुटलेल्या उसाच्या पिकात टाकून देण्यात आले होते.

याबाबत मयताचा भाऊ बाळू मधुकर शिंदे राहणार विसापूर यांच्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 569/2020 भा द वी कलम 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्याबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक आणि कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यासंदर्भात सूचना केल्या.

त्यानुसार तपास करत असताना घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब शिरसागर,पोलीस कॉन्स्टेबल नंदकुमार पठारे यांचे पथकाने

आपले कौशल्य वापरून शिताफीने मुकेश मोतीलाल गुप्ता वय 28 वर्ष राहणार मेहबूब पुरा तालुका जिल्हा भदोई उत्तर प्रदेश, हल्ली राहणार बेलवंडी झोपडपट्टी तालुका श्रीगोंदा यास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडून तपासाअंती महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment