सभासदांच्या उसाच्या खोडक्या केल्या जात आहेत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- अशोक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा गळीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस असून प्रतवारीही चांगली आहे. एकीकडे कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस बाहेरच्या कारखान्यांना दिला जात आहे, दुसरीकडे बाहेरून कोवळा ऊस आणून सभासदांच्या उसाच्या खोडक्या केल्या जात आहेत, अशी टीका पं. स. सदस्य डॉ. वंदना मुरकुटे यांनी केली. 

निवेदनात म्हटले आहे, कार्यक्षेत्रात गाळप क्षमतेपेक्षा जास्त ऊस असल्यामुळे व्यवस्थापनाने ऊस बाहेरच्या कारखान्यांना देण्याचा निर्णय घेतला. मग बाहेरून निकृष्ट ऊस कशासाठी आणला जातो?

सभासदांची ‘आडसाली’ पिके गाळपाविना उभी असताना बाहेरचे ‘खोडवे’ गळितासाठी आणले जात असल्याने कार्यक्षेत्रातील हार्वेस्टिंगचे नियोजन कोलमडले आहे. सभासदांचा परिपक्व असलेला ऊस गाळपाविना शेतातच उभा असून पांक्षा फुटल्याने वजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अठरा महिने करून जोपासलेल्या पिकांना तोडी मिळत नसल्याने शेतकरी काळजीत आहेत. कोलमडलेले हार्वेस्टिंग वेळीच दुरुस्त करून ऊस तोडींना गती मिळावी व सभासद हाच कारखान्याचा खरा मालक आहे, याची जाणीव ठेवून कार्यक्षेत्रातील ऊसतोडीला प्राधान्य द्यावे, असा सल्ला डॉ. मुरकुटे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment