‘वंचित’ विधानसभेच्या सर्व जागा लढविणार

Ahmednagarlive24
Published:

पुणे : एमआयएमबरोबर आमचे संबंध अद्यापही चांगले आहेत. त्यांनीच आमच्या युतीला कुलूप लावले असून, चावी त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे तेच कुलूप उघडू शकतात.

असे सांगतानाच अन्य मुस्लीम संघटना आमच्याबरोबर असल्याचा दावाही वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील २८८ जागा स्वबळावर लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आम्ही एमआयएम बरोबरची युती तोडली नाही. वंचितच्या समितीबरोबर एमआयएमने बोलणी करावी,

असे आवाहन करून ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात काही राजकीय पक्ष धर्माच्या नावावर तर कोणी धर्मनिरपेक्षतेच्या नावाने निवडणूक लढवित आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment