अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- मागील काही दिवसापासून ग्रामीण भागातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत.
मात्र आता शहरात देखील भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. नुकतीच या कुत्र्यांनी एका लहान मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
केडगाव उपनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच काल केडगाव भागातील सोनेवाडी रस्त्यावरील कापरे मळा या परिसरात आई बरोबर आलेला लहानगा आई किराणा घेत असताना थांबला असता.
त्याच्यावर हल्ला करून त्याच्या गालाचा, मानेचा, खांद्याला चावा घेऊन रक्तबंबाळ करीत अक्षरशः त्या बालकास लोळवले. सकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात शांतता होती.
त्यातच एक दोन जण बाहेर आल्याने कुत्र्यास हाकलले व बालकाची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली. असेच गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी या भटक्या कुत्र्यांनी कापरे मळया पासून जवळ असलेल्या अमरधाम मधून मानवी पाय तोंडात धरून आणला असल्याचे या ठिकाणी सांगितले जाते.
याबाबत महानगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातून होत आहे. केडगाव भागातील भटक्या, मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही कुत्री कळपा -कळपाने फिरत आहेत, रस्त्यावर गाडीला आडवी येऊन अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com