धक्कादायक!!या तालुक्यात केली जात होती चक्क गांजाची शेती

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-  नगरच्या स्थानिक गुन्हेशाखा व पाथर्डी पोलिसांनी पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील तिन शेतकऱ्यांच्या तुरीच्या शेतामधे लावलेल्या गांजाची झाडे पकडली आहेत.

सात गोण्या गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेतली, यातील दोन शेतकरी ताब्यात घेतले असुन एकजण बाहेरगावी गेलेला असल्याने तो पोलिसांना सापडलेला नाही. यावरून तालुक्यात गांजाची शेती होत असल्याचे उघड झाले आहे.

शेवगाव-पाथर्डीचे उपअधिक्षक सुदर्शन मुंडे, नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अनिल कटके, पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्यासह सुमारे तिस अधिकारी व पोलिस कर्मचा-यांनी एकनाथवाडी येथे बुधवारी सकाळी एकनाथवाडी येथे छापा मारला.

डोंगराच्या पोटाला असलेल्या व नगर आणि बीडच्या सिमेलगत डोंगराळ भागात तिन शेतक-यांनी गांजाची शेती केली होती. तिन ते पाच फुटापर्यंत वाढलेले गांजाची झाडे पोलिसांनी जप्त करून सुमारे सात गोण्या भरुन गांजाची झाडे पोलिस ठाण्यात आणली आहेत. एकनाथवाडी येथील दोन शेतकरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

एक शेतकरी बाहेरगावी गेलेला होता त्यामुळे तो पोलिसांना सापडला नाही. पोलिस कर्मचारी व अधिकारी साध्या वेशात असल्याने कोणाला काहीच समजले नाही. सुमारे दोन ते तिन किलोमीटर पायी प्रवास करुन डोंगराच्या जवळच असलेल्या तुरीच्या शेतामधे तिन ठिकाणी गांजाची झाडे आढळुन आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment