आराध्या जासूद ओलंपियाड आंतरराष्ट्रीय परीक्षेत गणित विषयात प्रथम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथील आराध्या जासूद हिने नुकत्याच झालेल्या सायन्स ओलंपियाड फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय परीक्षेत गणित विषयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

आराध्या बदलापूर येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत आहे. त्याचे वडिल अतिश जासूद हे सध्या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे.

तीला गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर पिंपलकर व वर्ग शिक्षिका पूजा गडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तीने मिळवलेल्या यशाबद्दल दैठणे गुंजाळ येथील माजी सरपंच पै. पांडूरंग (बंटी) गुंजाळ, अशोक केदार,

शिवाजी लावंड, सबाजी येवले, बापू गुंजाळ, संदीप जासूद, विलास गडाख, सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी अभिनंदन केले असून, तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment