राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.12 डिसेंबर रोजी नगर-पुणे महामार्ग येथील राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मुंबई येथे होणार्‍या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण नगरच्या कार्यालयात होणार आहे. यामध्ये ना. शरद पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी दिली.

शनिवारी राष्ट्रवादी भवन येथे शहराचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी 10:30 ते दुपारी 2 पर्यंत हा कार्यक्रम होणार असून, शहरातील सर्व सेलचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment