अहमदनगर : स्वत:च्या बारा वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या विकृत पित्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीनेच पतीविरोधात पोलिसांत धाव घेत याबाबत फिर्याद दिली.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भिंगार पोलिसात विकृत पित्याविरोधात बालकांचे लैंगिक अपरधाचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दाम्पत्याला एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्य आहेत. रविवारी रात्री हा विकृत पिता घरी आला. अंगावरील शर्ट काढून त्याने मुलगा आणि मुलगी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर त्याने मुलीला उचलून दुसऱ्या खोलीत नेले.
तेथे तिच्याशी अश्लील चाळे करून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पत्नीने पतीविरोधात दिली आहे. भिंगार पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून त्या विकृत पित्यात्याला ताब्यात घेतले आहे.