अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- पारनेर तालुका दूध संघाच्या शीतकरण केंद्रातील सव्वा कोटी किमतीच्या यंत्रसामग्रीची चोरी झाली असून पूर्वीच्या संचालक मंडळाने फौजदारी स्वरूपाचा गुन्हाही दाखल केला नसल्याचा आरोप प्रशासकीय मंडळाने केला.
दरम्यान, प्रशासकीय मंंडळास धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसून तसा उच्च न्यायालयाने आदेश दिल्याचे माजी अध्यक्ष राहुल शिंदे यांनी सांगितले.
शीतकरण केंद्राचा ताबा दादा पठारे यांच्याकडेच होता. त्यांनी तो आपल्याकडे वर्ग केला नव्हता. त्यामुळे चोरीबाबत त्यांनाच विचारा, असे शिंदे यांनी सांगितले.
प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब पठारे, सदस्य संभाजी रोहोकले व सुरेश पठारे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. हे शीतकरण केंद्र तीन दिवसांपूर्वी व्यवस्थापक दादाभाऊ गट,
तसेच तज्ज्ञांच्या उपस्थितीत इनकॅमेरा उघडण्यात आले असता तेथील एक ते सव्वा कोटीची मशिनरी चोरीस गेल्याचे उघडकीस आले.
तेथे केवळ तीन मोठ्या टाक्या शिल्लक असून त्या घेऊन जाता आल्या नसाव्यात. या टाक्यांची चोरी होऊ नये म्हणून प्रशासकिय मंडळाने तेथे सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली आहे.
वास्तविक चोरी झाल्यानंतर तत्कालीन संंचालक मंडळाने पोलिस ठाण्यात फिर्याद देणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही याचा काय अर्थ लावायचा तो सभासदांनी लावावा.
कुंपणानेच शेत खाल्लं आहे हे नक्की असा दावा प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. जिल्हा दूध संघाकडून तालुका दूध संघाच्या वाट्याचे ४ कोटी ६० लाख रूपये प्राप्त झाले होते.
त्याचेही वितरण शिंदे यांना करता आले नाही. जिल्हा दूध संघाकडून वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची थकीत रक्कमही तेे देऊ शकले नाहीत, असे सांगण्यात आले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- व्यवसायासाठी पाहिजे कर्ज ? ‘ही’ बँक देणार 10000 कोटींचे कर्ज
- ‘असे’ ओळखा आपल्या आधार कार्डशी कोणता मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर आहे
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : 10 डिसेंबरपासून 2000 रुपये खात्यात जमा होणार !
- आरोपी बाळ बोठे विरोधात रेखा जरे यांच्या मुलाने केले धक्कादायक खुलासे !