लग्न सोहळ्यातून ७ लाखांचे दागिने लंपास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- विवाह सोहळा सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी हिरे व सोन्याचे दागिण्यांची बॅग लंपास केली.

या बॅगमध्ये असलेले ५० हजार रूपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा ७ लाख १८ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. नगर तालुक्यातील चास शिवारात असलेल्या हेमराज फार्म येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात सचिन वर्धमान गुंदेचा (वय- ४६ रा. बार्शी जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंदेचा यांच्या परिवाराचा हेमराज फार्म या मंगलकार्यालयात बुधवारी लग्न सोहळा आयोजित केला होता. या लग्न सोहळ्यात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दागिण्याची बॅग लंपास केली.

लग्नासाठी आणलेले दागिणे लंपास झाल्याने लग्न सोहळ्यात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

परंतू, चोरटे बॅग घेऊन पसार झाले होते. या बॅगेत असलेली ५० हजार रूपयांची रोकड, सोन्याचे मंगळसूत्र, डायमंड, नेकलेस, बांगड्या, कर्णफुले, अंगठा असा एकूण ७ लाख १८ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

लग्न सोहळ्यातून एवढ्या मोठ्याप्रमाणात सोने चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या शोधासाठी तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कामाला लागले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment