अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे.
या कायद्याचे उल्लंघन करणारी केंद्रे अथवा व्यक्ती तसेच बेकायदेशीर गर्भपाताविषयी नागरिकांनी माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी केले.

अशा प्रकारचे कृत्य होताना आढळल्यास नागरिकांनी ़१८००-२३३-४४७५ या हेल्पलाइन क्रमांकावर तथा www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तक्रारीची खातरजमा होऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणाऱ्यास शासनाच्या खबऱ्या बक्षीस योजने अंतर्गत रुपये १ लाखापर्यंत बक्षीस देण्यात येईल.
तसेच संबंधितांचे नाव गोपनीय राखले जाईल. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे आणि असे प्रकार आल्यास तक्रार नोंदवावी, असे सांगितले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com