अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे.
सरकारी वकील सतीश पाटील यांनी ही माहिती दिली. तर, दुसरीकडे जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी बोठे याने स्वतः न्यायालयात हजर राहावे, असा अर्ज पोलिसांकडून देण्यात आला असून, तो सरकारी वकिलांमार्फत न्यायालयात दिला जाणार आहे.

त्यातच रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने आरोपी बोठे याच्याकडून कुटुंबाला धोका असल्याचे निवेदन पोलीस प्रशासनाला दिले आहे. आता हा मुद्दा सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात मांडला जातो का, याकडेही लक्ष लागले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com