अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, अशी प्रतिक्रिया नवनीत कौर राणा यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर खासदार नवनीत कौर राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात.
एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत, असं नवनीत राणा यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीमागे काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. येत्या काही काळात शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांमध्ये येत होत्या.
मात्र या बातमीचं खंडन करत यामध्ये तथ्य नसल्याचं स्वत: शरद पवार यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातला कित्ता दिल्लीतही गिरवला जावा आणि केंद्रामधलं सरकार सत्तेच्या खाली खेचावं, हे सगळं प्लॅनिंग पवारांकडे देण्याचं नियोजन सोनिया गांधी यांचं असल्याचं बोललं गेलं. मात्र “या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही” असं दस्तुरखुद्द शरद पवार म्हणाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com