शेतकरी आंदोलन चिघळवण्याचा काही मंडळींचा प्रयत्न : आमदार राधाकृष्ण विखे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- केंद्रात यूपीए सरकार असताना बाजार समित्यांसाठी मॉडेल अ‍ॅक्ट आणणाऱ्या काँग्रेसला त्यांच्याच धोरणाचा विसर पडला आहे. कृषी विधेयकाबाबत केंद्र सरकार आंदोलक शेतकरी संघटनांशी चर्चेची तयारी दर्शवत आहे.

मात्र काही मंडळी राजकीय फलीत साध्य करण्यासाठी आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्नात असल्याची टिका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. येथील विश्रामगृहात आमदार विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलना संदर्भात त्यांनी विरोधी पक्षांवर कडाडून टिका केली. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न राज्यपालांकडे मांडल्यानंतर राजभवनाचा राजकीय आखाडा करु नका, असे सल्ले देणारी मंडळी यासाठी राष्ट्रपतींकडे जावू लागली आहे.

आता राष्ट्रपती भवनही राजकीय आखाडा होतोय का? अशी शंका उपस्थित होत आहे. केंद्रात युपीए सरकारने बाजार समित्यांसाठी मॉडेल अ‍ॅक्ट तयार केला. तत्कालिन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी अ‍ॅक्टची अंमलबजावणी सर्व राज्यांना करायला भाग पाडले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment