अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- देशात आरटीजीएसची (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टिम) सुविधा १४ डिसेंबरपासून दररोज २४ तास सुरू राहील. यानंतर भारत अशा निवडक देशांत समाविष्ट होईल, जिथे ही सुविधा रात्रंदिवस काम करते.
ही सेवा १३ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑक्टोबरमध्ये आरटीजीएस प्रणालीला २४ तास काम करणारी प्रणाली बनवण्याची घोषणा केली होती.
‘आरटीजीएस’च्या माध्यमातून (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ग्राहकाला एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येते. एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत आर्थिक हस्तांतरण होताना वास्तविक वेळेत व्यवहार होतात.
रिझर्व्ह बॅंकेने ठरवून दिलेल्या वेळेतच अशा प्रकारचे व्यवहार पूर्ण होतात. नेटबॅंकिंग करत असाल तर बॅंकेत न जाता ग्राहक आरटीजीएसचा पर्याय वापरून ज्यांना पैसे हस्तांतर करायचे आहेत त्या व्यक्तीचा खाते क्रमांक, बॅंक कोड देऊन पैसे पाठवता येतात.
या प्रणालीत वेळेनुसार शुल्क वाढत जाते. ज्यात सकाळच्या सत्रात कमी शुल्क असते नंतर ते तासागणीक वाढत जाते. किमान २ लाख रुपये ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून पाठवता येतात. पैसे पाठवण्याची कमाल मर्यादा नाही मात्र बँकांकडून १० लाखांपर्यंत हस्तांतर करण्यास परवानगी आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये