टेम्पो व दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरु आहे, या घटनांमध्ये दरदिवशी अनेकांचे नाहक बळी जात आहे. असाच एक अपघात श्रीरामपूर तालुक्यात घडला आहे.

श्रीरामपूर-बाभळेश्वर रस्त्यावर नांदूर गावच्या शिवारात भरघाव वेगाने येणार्‍या टेम्पो व दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार हा जखमी झाला.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर-बाभळेश्वर रस्त्यावर नांदूर गावच्या शिवारात एका टेम्पो चालकाने अविचाराने गाडी चालवून समोरून येणार्‍या मोटारसायकलला धडक दिली.

या धडकेत इंदिरानगर, रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ, शिरसगाव रोड परिसरात राहणारा मोटारसायकलवरील वैभव विलास पंडित हा जखमी झाला.

याप्रकरणी वैभव विलास पंडित याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment