अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-जीमेल, ड्राइव्ह किंवा फोटो यासारख्या Google च्या फ्री वर्जन यूज करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
गुगलने असे म्हटले आहे की ज्या वापरकर्त्यांचे खाते दोन वर्षांहून अधिक काळ निष्क्रिय राहील त्यांचा डेटा डिलीट केला जाईल. Google हा नियम 1 जून 2021 पासून लागू करेल, परंतु ज्यांनी त्यातून एडिशनल स्टोरेज कॅपॅसिटी घेतली आहे अशा वापरकर्त्यांना हे लागू होणार नाही.
जून 2021 पासून निश्चित होणार यूजर लिमिट :- गुगलने नोव्हेंबरमध्ये म्हटले होते की 1 जून, 2021 पासून यूजर्स त्यांच्या क्लाउड बेस्ड बॅक अप सर्विसमध्ये किती हाय क्वालिटी फोटोज ठेवू शकतात हे ठरवले जाईल.
फाईल आणि फोटो Google च्या डॉक्यूमेंट एडिटिंग सर्विसेजमध्ये ठेवण्यासाठी एकूण 15 गिगाबाईट्सची मर्यादा निश्चित केली जाईल. पूर्वी केवळ ओरिजनल क्वॉलिटी इमेज म्हणजेच अत्यंत उच्च रिझोल्यूशनची कॉपी या लिमिटमध्ये मोजली जात होती.
प्रॉफिट मार्जिन सेफ ठेवण्यासाठी प्रयत्न :- तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुगल आपला प्रॉफिट मार्जिन सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. क्लाउड स्टोरेज सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीवर अपेक्षित महसूल नसल्यामुळे अलिकडच्या वर्षांत गुगलचा नफा कमी झाला आहे.
कंपनीने यंदा हे भरून काढण्याचे नियोजन केले आहे. याकरिता, एडिशनल स्टोरेज कॅपॅसिटीच्या सब्सक्रिप्शन सर्विस गूगल वन अंतर्गत प्रदान केलेल्या सुविधा समायोजित करीत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com