शेतकरी विरोधी वक्तव्य करत मंत्री दानवे परिस्थिती चिघळवत आहे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- शेतकर्‍यांच्या विरोधात जाऊन कायदा पारित केला. इंधन दरवाढ दररोज वाढत चालली आहे. सर्वसामान्य माणसाला करोना काळात जगने मुश्किल झाले असताना चुकीच्या धोरणामुळे अनेक गोष्टींवर परिणाम जाणवायला लागले आहे.

याचा निषेध म्हणून शिवसेनेनं पाथर्डी मध्ये आंदोलन केले. पाथर्डी तालुका शिवसेनेकडून शहरातील वसंतराव नाईक चौकात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, इंधन दर वाढ कमी करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच यावेळी शेतकऱ्यांविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांचा देखील निषेध करण्यात आला.

सत्तेत राहून हुकूमशाहीपणाने वागणे केंद्रातील मंत्री मंडळी करत असून यांचे खा. रावसाहेब दानवे हे शेतकर्‍यांविषयीचे चुकीचे वक्तव्य करून परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करतात.

येणार्‍या काळात तीव्र आंदोलन करू, असा इशाराही ही दराडे यांनी यावेळी दिला. या आंदोलनात शिवसेनेचे शेवगाव-पाथर्डी विधानसभा संघटक भगवान दराडे,

शिवसेना तालुकाध्यक्ष अंकुश चितळे, शहराध्यक्ष सागर राठोड, बंडू ससे, भीमसेन अकोलकर, घनशाम घोडके, सुनील पालवे, लखन शिंदे, दत्ता दराडे, दादासाहेब फुंदे, अमोल मरकड, सोहेल पठाण, दादा पारखे, नवनाथ वाघ, अमोल जायभाय आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment