अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-फेक टीआरपी घोटाळ्यासंदर्भात रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आलीये. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडून फेक टीआरपी घोटाळा उघड करण्यात आला होता. त्यामध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून नुकतच रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक केली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होतं. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा तसंच रिपब्लिक टीव्ही यांना वाढीव टीआरपीचा लाभ मिळालेला.
या घोटाळ्यामध्ये बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवण्यात येत असल्याचं समोर आलं होतं.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये