अतिक्रमण करणार्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करा !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-नागरदेवळे (तालुका नगर) येथील ग्रामपंचायत सदस्य स्नेहल भागचंद तागडकर यांनी आलमगीर येथील सार्वजनिक नाळा बुजवून त्यावर अतिक्रमण केलेले आहे.

तर सदर ठिकाणी अवैद्य दारू व पेट्रोल विक्री सुरु असल्याचा आरोप करुन, तक्रारदार शादाब हुसेन पठाण यांनी त्यांचे ग्रामपंचायतचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदनाद्वारे केली आहे.

नागरदेवळे येथे ग्रामपंचायत सदस्य स्नेहल भागचंद तागडकर यांनी ग्रामपंचायत नागरदेवळेचे उपनगर आलमगीर येथील मोठा नाळा दगड, माती टाकून बुजवून त्यावर पत्र्याची शेड टाकली आहे.

तर या शेडमध्ये वॉशिंग सेंटरचा व्यवसाय दाखवून तेथे अवैद्य दारू व पेट्रोल विक्रीचे काम त्यांचे पती भागचंद शंकर तागडकर करीत आहेत.त्याचप्रमाणे अतिक्रमण केलेल्या जागेत विद्युत मीटर हे तागडकर यांच्या नावाने दिसत आहे.

विद्युत मीटर घेण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रे सादर करून महावितरण व ग्रामपंचायतींची देखील त्यांनी फसवणूक केली आहे.

तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे पती भागचंद तागडकर यांनी २६२ प्लॉट नंबर १२ व १३ च्या शेजारी अतिक्रम ण केल्यामुळे ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यात आले आहे.

त्यामुळे शेजारील रहिवासींच्या कॉलनीमध्ये नाल्याचे पाणी शिरत आहे. तसेच सर्व्हे नंबर २६२ मधील ओपन स्पेस मध्ये कॉलनीच्या रहिवासींनी उद्यान केले आहे.

त्या उद्यानात जाण्यासाठी सदर अतिक्रमण अडथळा ठरत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ग्रामपंचायत सदस्स्यांनी गावातील ग्रामस्थांसाठी विविध योजना राबवून गावाचा विकास करणे अपेक्षित आहे.

मात्र स्नेहल भागचंद तागडकर यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचे काम चालवले असून,

सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणार्‍या सदर ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करुन, त्यांना दहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची मागणी पठाण यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment