मुंबई येथे शानदार सोहळ्यात जाकीर शेख ‘लिजेंड दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-मुंबई येथील कृष्णा चौहान फौंडेशनच्यावतीने चित्रपटसृष्टी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींचा लिजेंड दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड 2020 देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

अंधेरी, मुंबई येथे झालेल्या या शानदार सोहळ्यात चित्रपटातील कला-अभियानाबद्दल नगरचे जाकीर हुसेन शेख यांना राज्यस्तरीय ‘लिजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक कृष्णा चौहान, सुधाकर शर्मा, संगीतकार दिलीप सेन, गायक शाहिद मालया, अभिनेते सुनिल पाल, अजाज खान,

डॉ.योगेश लखानी, अरविंद वाघेला, अभिनेत्री रुबी अहमद आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कृष्णा चौहान म्हणाले, फौंडेशनच्यावतीने दरवर्षी चित्रपटसृष्टी व सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींना चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात येत आहे.

आपआपल्या क्षेत्रात काम करुन सामाजिक दायित्व जपणार्‍या व्यक्तींनी केलेल्या कार्याचा गौरव व्हावा, हा यामागील हेतू आहे. ज्येष्ठ सिनेअभिनेते जाकीर हुसेन शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नगरमध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे मोठे योगदान दिले आहे.

त्यांनी जय हिंद, बालाजी या चित्रपटात भुमिका केल्या असून, जय मोहटा देवी चित्रपटाचे सहनिर्माताही होते. गोरेगांव, अंधेरी, मुंबई येथे किंग फिल्म इंटरनॅशनल प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून चित्रपटाचे काम सुरु आहे. त्यांनी सुरु केलेल्या पर्यटन महोत्सवामुळे नगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळाली.

त्याचबरोबर या महोत्सवाच्या माध्यमातून विविध स्पर्धांच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, अन्नदान, राष्ट्रपुरुषांचा सन्मान, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन अशा विविध माध्यमातून त्यांचे कार्य सुरु आहे.

कोरोना काळातही त्यांनी गरजू लोकांना मदतीचा हात देऊन आधार देण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मुंबई येथील फौंडेशनच्यावतीने त्यांचा ‘लिजेंड दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड देऊन गौरव केला आहे. जाकीर शेख यांचा राज्यस्तरावर झालेल्या गौरवाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe