पत्नीला रुबाब दाखवायला गेला आणि झाली फजिती… अखेर अहमदनगरच्या ‘त्या’ तोतया पोलिसाला अटक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-पोलिस अधिकारी असल्याची बनवेगिरी करत पोलिसांचा गणवेश परिधान करून पत्नीच्या बँकिंग परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या एका तोतया पोलिसाला वानवडी पोलिसांनी अटक केली.

भाऊसाहेब महादेव गोयकर (वय -25 वर्षे, रा. गुरव पिंपरी, थीटे वाडी, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती दिसला.पण त्याच्याकडे पाहून त्याच्यावर संशय आला. त्याच्या खांद्यावर ‘मपो’ ऐवजी मपोसे असे लावले होते.

पोलिसांनी त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. पण त्याच्याकडे ओळखपत्र नव्हते. तर तो उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता पोलीस नसल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलीसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशीत त्याने सांगितले की लॉकडाऊनमध्ये आपण पोलिस भरतीत आले आहोत असे खोटे पत्नीला सांगितले होते.

त्यामुळे पत्नीला खरे वाटावे म्हणून तो गणवेश घालून रामटेकडी येथे पत्नीसोबत बँकिंगच्या परीक्षेसाठी आला होता. भाऊसाहेब गोयकर हा सध्या चाकण येथे राहतो. त्याचा फ्रॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.

लॉकडाऊनमध्ये आपण पोलिसात भरती झाले आहे, असे त्याने खोटेच पत्नीला सांगितले होते. पत्नीला खरे वाटावे, म्हणून गणवेश घालून रामटेकडी येथे पत्नीबरोबर बँकिंगच्या परीक्षेसाठी आलो होतो, असे त्याने सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडून पोलीस गणवेश, मोबाईल,रोख रक्कम, मोटारसायकल असा २ लाख १५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe