अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-थंडी निमित्त शहरातील तापमानाचा पार खालवत असताना भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने निराधार व वंचित घटकातील 80 ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादीचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भिंगार येथे निराधार व वंचित घटकातील अनेक ज्येष्ठ नागरिक उघड्यावर झोपून आपले जीवन जगत आहे. वाढत्या थंडीचा तडाखा पाहता अंगात हुडहुडी भरत आहे.
उघड्यावर झोपणार्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी पुढाकार घेऊन वंचितांना या उपक्रमाच्या माध्यमातून मायेची ऊब देण्याचा प्रयत्न केला आहे. रोकडेश्वर मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव अशोक बाबर व शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांच्या हस्ते वंचित घटकातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेश नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार झंवर, भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष नाथाजी राऊत, संभाजी भिंगारदिवे, प्रा. कैलास मोहिते, सुभाष होडगे, रमेश वराडे, निलेश इंगळे, गणेश बोरुडे, लहू कराळे, अर्जुन बेरड,
फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, संपतराव बेरड, दिपक बडदे, सुदाम गांधले, सर्वेश सपकाळ, संजय खताडे, बाळासाहेब राठोड, अथर्व सपकाळ, कॅन्टोमेंटचे सदस्य सुरेश मेहतानी, शामराव वाघस्कर, अक्षय भिंगारदिवे, रिजवान शेख, शुभम भंडारी, अजिंक्य भिंगारदिवे, स्वप्निल खरात, गणेश शिंदे, अविनाश जाधव, राजू शिंदे, ईश्वर गवळी, संतोष चोपडा, अरुण वराडे, प्रशांत चोपडा आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात संजय सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाची शरद पवार यांचे विचार व मार्गदर्शनाखाली राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन वाटचाल चालू आहे. राजकारणातील आदर्श व धोरणी नेतृत्व महाराष्ट्राला शरद पवार यांच्या रुपाने लाभले आहे. 80 वर्षाच्या युवकाचा झंझावात महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळत आहे. त्यांच्या विचारानाचे भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने भिंगारचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कटिबध्द राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा.माणिक विधाते म्हणाले की, ना. शरद पवार यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्राला लाभला, हा महाराष्ट्रातील जनतेचा अभिमान आहे. समाजकारण हा राष्ट्रवादी पक्षाचा पाया आहे. त्यांनी राजकारणात राहून समाककारण करायला शिकवले.
सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी राष्ट्रवादीची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचा अनुभव व अभ्यास देशाला दिशा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक बाबर यांनी दरवर्षी संजय सपकाळ सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता विविध सामाजिक उपक्रम राबवित असतो.
वंचितांच्या सेवेसाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. वंचित व दुर्बल घटकांना मदत करण्याची भावना राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेटसह मास्क, साबण व मिष्टन्न भोजनाचे वाटप करण्यात आले
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये