नगरसेवक सागर बोरूडे यांच्या वतीने निंबळकच्या ध्यान आश्रम उभारणीच्या कामासाठी सिमेंटची मदत

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-निंबळक (ता. नगर) येथील प.पू. माताजी श्री निर्मला देवी प्रणीत सहजयोग ध्यान आश्रम उभारणीच्या कामासाठी मनपाचे नगरसेवक सागर बोरूडे यांनी 30 सिमेंटच्या गोणी भेट दिल्या.

यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश घोगरे पाटील, अशोक कोतकर, दीपक कळसे, शिवशंकर मतकर, शांतिलाल काळे, श्रीमंत किंकर, जाधव साहेब, नानासाहेब कुसमाडे, महेश म्हसे, उमेश तोगे, अभय ठेंगणे, चव्हाण काका, सौरभ बोर्डे, महेश घोगरे आदि उपस्थित होते.

नगरसेवक सागर बोरूडे म्हणाले की, मानसिक समाधान हेच जीवनाचे खरे सुख आहे. ध्यानधारणेने हे सुख जीवनात अनुभवता येतो. स्पर्धेच्या व धावपळीच्या जीवनात मनुष्य जीवन जगण्याचा आनंद विसरत चालला आहे.

ध्यानामुळे मनुष्यात आत्मविश्‍वास वाढून नवीन विचाराला चालना मिळून मन एकाग्र होते. ग्रामीण भागातील नागरिकांना ध्यानधारणेचे धडे घेता यावे या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या ध्यान आश्रमास मदत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.