धक्कादायक बातमी ! कोरोनाने घेतला पंतप्रधानांचा बळी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :-  कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांची आर्थिक चक्रेही थांबली. या कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. यात सर्वसामान्यांबरोबर राजकीय व्यक्ती मोठमोठे कलाकार हे देखील याला बळी पडले.

आता आफ्रिका खंडातील एका देशात पंतप्रधानांचाच कोरोनानं बळी घेतला आहे. कोरोनाशी महिनाभर झुंज दिल्यानंतर इस्वाटिनी देशाचे पंतप्रधान एम्बोरोसे डलामिनी यांचा मृत्यू झाला आहे.

एक डिसेंबरपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांचा हा लढा ते हरले. रुग्णालयातच रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इस्वाटिनीचे उपपंतप्रधान थेंबा मसुकू यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. इस्वाटिनी हा दक्षिण आफ्रिकेतील छोटासा देश आहे.

1.2 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील या देशात 6,768 कोरोना रुग्ण आहेत. 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतामध्ये काही नेत्यांचा कोरोनावर उपचार घेताना प्रकृती गंभीर झाल्यानंतर तर काही जणांनी कोरोनावर मात केल्यानंतरही गुंतागुत निर्माण झाल्यानं आपला जीव गमावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!