नेतृत्व पाच वर्षे चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यामुळे तालुक्याच्या पाणीप्रश्नाचे वाटोळे !

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- तालुक्याचे नेतृत्व पाच वर्षे चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यामुळे पाणीप्रश्नावर तालुक्याचे वाटोळे झाले. सामान्य शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला.

ही चूक सुधारण्यासाठी पुन्हा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना तालुक्याचे लोकप्रतिनिधी करण्यासाठी संपूर्ण गावाने विजयासाठी एकोपा करून एल्गार पुकारला आहे. यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भगवानराव पाचपुते यांनी केले.

तालुक्यातील काष्टी येथील राजयोग मंगल कार्यालयात गुरुवारी सायंकाळी गावाची बैठक भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिल पाचपुते,

जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, नागवडे दूध संघाचे माजी अध्यक्ष माणिकराव पाचपुते, विठ्ठलराव काकडे, दिलीप चौधरी, बाळासाहेब राहिंज, शिवाजीराव पाचपुते, बंडू जगताप, डाॅ. बाळासाहेब पवार, बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते, रफिक इनामदार, ज्ञानदेव गवते आदी उपस्थित होते.

माजी मंत्री पाचपुते म्हणाले, विधानसभेचे तिकीट आपल्यालाच आहे. काही जण माझ्यावर आरोप करतात, पण त्यांची तेवढी उंची व पात्रता नाही, म्हणून टीका करून कोणाला मोठे करायचे नाही, अशी कोपरखळी पाचपुते यांनी आमदार राहुल जगताप यांचे नाव न घेता लगावली. आपले तालुक्यात तीनवेळा दौरे झाले. विरोधक कुठेच पोहोचले नाही, असेही पाचपुते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment