अभिप्राय नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणार्‍या ओबीसी सेलचे अमित खामकर यांचा विशेष सन्मान

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी पक्षाच्या अभिप्राय नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणार्‍या ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

तर नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, संभाजी पवार, उद्योजक जय दिघे व आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक विपुल शेटीया, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे,

महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, निलेश इंगळे, गणेश बोरुडे, संतोष ढाकणे, मनोज नन्नवरे, माऊली जाधव, मनोज गुंजाळ, मोहन गुंजाळ आदि उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात युवकांचे उत्तमपणे कार्य सुरु आहे.

अभिप्राय नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविण्याचा बहुमान नगरला मिळाला असून, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. राष्ट्रवादी हा युवकांचा पक्ष म्हणून समाजकारणाला महत्त्व देऊन प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी कार्य करीत आहे. शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे संघटन विकासाला चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!