लाच घेताना पोलिसाला अटक; या ठिकाणी घडली घटना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-जिल्हा पोलीस दलामध्ये भ्रष्टाचाराचे सत्र काही केल्या संपेना… नुकतेच संगमेनर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा ताजी असताना अजून एक माहिती समोर आली आहे.

अकोले पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक संतोष वाघ हा सोमवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याला दहा हजार रुपयांसह ताब्यात घेण्यात आले.

एका शेतकऱ्याचा जमिनीबाबत वाद सुरू होता. झटपट मार्ग निघावा,यासाठी वाघ याने पैशांची मागणी केली. संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली.

पथकाने सोमवारी दुपारी अकोले पोलिस ठाण्यात सापळा लावला. दहा हजारांची लाच घेताना वाघला रंगेहात पकडण्यात आले. शासकीय विश्रामगृहावर त्याची चौकशी करण्यात आली.

नंतर वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान वाढती गुन्हेगारी रोखण्याबरोबरच पोलीस दलाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी आता नूतन पोलीस अधीक्षकांना पार पाडावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment