अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील 11 हजार घरकुल वंचितांना तसेच परिसरातील 5 हजार घरकुल वंचितांना परवडणारी घरे मिळावीत व त्यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी शहराच्या उत्तरेला असलेल्या नवनागापूर, निंबळक, इसळक आणि वडगावगुप्ता या चार गावांसाठी एक नगरपालिका स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
तर घरकुल वंचितांचा सत्यबोधी सूर्यनामा करुन सदर प्रस्तावाचे निवेदन घरकुल वंचितांच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविण्यात आले आहे. इसळक, निंबळक शिवारामध्ये सुमारे चारशे एकर खडकाळ पड जमीन आहे. तसेच वडगावगुप्ता, नागपूर या सलग गावांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात पड जमीनी आहेत.
या खडकाळ जमीनीवर आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प राबवले जाऊ शकतात. शहरांमध्ये असणार्या झोपडपट्ट्या विसर्जित करण्यासाठी हा प्रकल्प प्रभावी ठरणार आहे. या भागात रस्ते, वीज व पाणी या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सबल स्थानिक स्वराज्य संस्था असणे आवश्यक आहे.
हा प्रश्न सुटण्यासाठी नगरपालिकेची मागणी करण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील कोणतेही सरकार कोणत्याही घरकुल वंचितांना रेशन कार्डवर फुकट घर किंवा भूमी गुंठा देऊ शकणार नाही. याची जाणीव झालेल्या बैठकित घरकुल वंचितांना करुन देण्यात आली.
त्याचबरोबर आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय घरकुल वंचितांना स्वस्तात घरे मिळणार नाही. ही बाब सत्य असल्याचे सर्वांनी मान्य केली. घरकुल वंचितांनी एकत्रित होऊन यापूर्वी घरकुलासाठी प्रयत्न न केल्यामुळे 73 वर्षात घरकुल वंचितांना सामाजिक न्याय मिळू शकलेला नाही.
परंतु आता घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेद्वारे संघटना प्रयत्न करीत असताना राज्य सरकारने मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन दुबळ्या समाज घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी यावेळी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, प्रमिला घागरे, सुरेखा आठरे, बाबासाहेब सरोदे, पुनम पवार, मनिषा राठोड, लंकाबाई शिंदे, पोपट भोसले, सविता भोसले, श्रध्दा दुग्गल, लतिका पाडळे, फरिदा शेख, शालिनी भिंगारदिवे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये