अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार फरार आराेपी बाळ बाेठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अखेर आज सुनावणी पूर्ण झाली आहे.
रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे कारण त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर झाला आहे.
काल कोर्टाने हा निकाला राखून ठेवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशियत सूत्रधार बाळ ज. बोठे याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने आज फेटाळला.
या अटकपूर्व जामिनावर काल जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर युक्तिवाद झाला होता. जिल्हा सरकार वकील सतीश पाटील यांनी सरकार पक्षातर्फे, तर अॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेतर्फे युक्तिवाद केला होता.
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला रात्री पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या झाली. या हत्येत आतापर्यंत पाच जणांना अटक झाली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये