पारनेर: तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावर पळवे शिवारात दि.२६ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास हॉटेल धनश्री हॉटेल समोर उभ्या असलेल्या कंटेनर (क्र.एम.एच. ४६ बी.बी.२५६४) ला पुण्याकडून नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टेम्पो (क्रं.एम.एच१२ एफ.झेड.७९८६) ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने टेम्पो चालक जागीच ठार झाला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पळवे शिवारातील हॉटेल धनश्री समोर रस्त्याच्या साईड पट्टीवर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या कंटेनरला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली.
त्यावेळी पाऊस चालू असल्याने उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने कंटेनरवर धडकल्याने त्यात टेम्पो चालक शरद वामनराव पाईकराव (वय -४५ रा सातार माळ ता. पुसद. जि. यवतमाळ) हा ठार झाला तर त्यासोबत असणारा एक जण जखमी झाला.
त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब बबन पारखे रा.वाघुंडे खुर्द यांच्या फिर्यादी वरून सुपा पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- Plastic Tea Cup : प्लास्टिक कपातून चहा पिणे योग्य आहे का ? वाचा काय आहेत परिणाम ?
- शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले
- राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर
- Jal Jeevan Mission :जलजीवन योजनेचे भवितव्य धोक्यात ! राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक अडथळे
- ‘एमआयडीसी’मध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आमदार हेमंत ओगले