अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे, या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील सरसावले आहे. अशाच एका टोळीला पोलिसांनी मोठ्या धाडसाने गजाआड केले आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत केडगाव शिवारात कांदा मार्केट ते निल हॉटेल दरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले आहे.
पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे व पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि विवेक पवार व कर्मचार्यांनी दि.14 रोजी मध्यरात्री सापळा रचून आरोपींना पकडले.
एका दुचाकीवर तिघे तर दुसर्या दुचाकीवर दोघे आरोपी होते. पोलिसांनी एका दुचाकीवरील तिघांना पकडले तर दुसर्या दुचाकीवरील आरोपी पलायन करण्यात यशस्वी झाले आहे.
ताब्यात घेतलेल्या तिघांकडून एक एअर पिस्टल, विना क्रमांकाची दुचाकी, चाकू, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यातील आरोपी नितीन किसन पवार सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात कोतवाली, नगर तालुका पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये