राज्यात परत युतीचेच सरकार येणार : ना.राम शिंदे

Ahmednagarlive24
Published:

जामखेड : गेल्या ५० वर्षांत जे काम झाले नाही ते तुमच्या आशीर्वादाने पाच वर्षांत करुन दाखवले. आता फक्त तरुण पिढीला कायमस्वरूपी हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी कर्जत तालुक्यातील सुत गिरणीच्या कामाला सुरुवात केली आहे.

आगामी काळात जामखेड तालुक्यातील एमआयडीसी व मोठ मोठे उद्योग येथे सुरू करण्यात येणार आहेत. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेत्वृत्वाखाली भाजपची सत्ता असून महाराष्ट्रात देखील पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तुमची साथ आणि आशीर्वादाची गरज आहे. असे मत पालकमंत्री ना.राम शिंदे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील दिघोळ माळेवाडी येथे पालकमंत्री ना.शिंदे यांनी भेट दिली. यावेळी ते ग्रामस्थांशी बोलत होते.

यावेळी हभप रामकृष्ण रंधवे बापू महाराज, तालुका अध्यक्ष रवी सुरवसे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, उद्योजक राजेंद्र देशपांडे, सरपंच केशव वनवे, नंदू गोरे, विश्वविजेते पै.राहुल आवारे यांचे पिताश्री पै.बाळासाहेब आवारे, माजी पं.समिती सदस्य मनोज राजगुरू, गहिनीनाथ गीते, उपसरपंच सुनील रंधवे, पवन जाधव, मिठू राऊत,

अंबादास आवारे,लक्ष्मण माने, भीमराव तागड, नवनाथ मुसळे, बाळू दगडे, हनुमान पोतदार,राहुल टाळे,सागर जाधव,डॉ.नवनाथ गिरी,मधुकर आवारे, डॉ.बनकर, हरिदास आवारे, विठ्ठल विधाते, संभाजी विधाते,अनिकेत राजगुरू, विठ्ठल आवारे, कैलास आवारे, शिवाजी तळेकर, जितेंद्र गवळी, बप्पा आवारे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment