शासकीय आयटीआय प्रवेशाबाबत आवाहन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेची (आयटीआय) सन 2020-21 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असुन जास्‍तीत जास्‍त उमेदवारांनी आपले प्रवेश निश्चित करावे.

तसेच तिस-या प्रवेश फेरीचे प्रवेश दि. 12 डिसेंबर 2020 पासुन सुरू झालेले आहेत. तरी ज्‍या उमेदवारांना अॅलॉटमेंट लेटर प्राप्‍त झाले आहेत अशा उमेदवारांनी त्‍या त्‍या आय.टी.आय.शी आवश्‍यक कागदपत्रे व शुल्‍क भरुन प्रवेश निश्चित करावेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचे सर्व अभ्‍यासक्रम हे रोजगारभिमुख असुन प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंर उमेदवारांना शिकाऊ उमेदवारीच्‍या संधी उपलब्‍ध आहेत.

आय.टी.आय. चे प्रशिक्षण पूर्ण केल्‍यानंर खाजगी औद्योगिक कारखाने, सरकारी आस्‍थापना जसे विद्युत महामंडळ, रेल्‍वे विभाग परिवहन महामंडळ, औष्णिक विद्युत केंद्र इत्‍यादी ठिकाणी नोरीच्‍या संधी उपलब्‍ध आहेत. तरी प्रवेश इच्‍छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.admission.dvet.gov.in या संकेतस्‍थळाला भेट द्यावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News