जिल्‍हा क्रीडा संकुल फिरण्‍यासाठी व शारीरिक व्‍यायामासाठी सुरू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्‍ये क्रीडा संकुल, स्‍टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांना वैयक्तिक व्‍यायामासाठी सामाजिक अंतराच्‍या निकषांचे पालन करुन खुले ठेवणेस परवानगी दिली असुन प्रेक्षक वा सामुहिक जमावाला परवानगी दिलेली नाही.

त्यानुसार, जिल्‍ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता नॉन रेड झोन मध्‍ये क्रिडा संकुले, स्‍टेडियम आणि इतर सामुहिक जमावाला परवानगी असणार नाही. शारिरीक व्‍यायाम व इतर व्‍यवहार, कृती, क्रिया यासाठी सामाजिक अंतराच्‍या निकषांचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेश देण्‍यात आलेले आहेत.

त्‍यानुसार दि. 16 डिसेंबर 2020 पासुन जिल्‍हा क्रीडा संकुल, स्‍टेडियम आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा हे प्रेक्षक वा सामुहिक जमावाला वगळुन फिरण्‍यासाठी व शारिरीक व्‍यायामासाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते 9 या कालावधीत सामाजिक अंतराच्‍या निकषांचे पालन करुन खुले ठेवण्‍यात येईल.

शारिरीक व्‍यायाम व इतर व्‍यवहार, कृती, क्रिया करतांना सामाजिक अंतराचे पालन करावे व संकुलात प्रवेश करण्‍यापुर्वी व संकुलातुन बाहेर जातांना मास्‍कचा तसेच सॅनिटायझरचा वापर केलेला असावा तसेच संकुल समितीने निश्चित केलेली प्रवेश फीची रक्‍कम भरुन व प्रवेश पास सोबत असेल तरच संकुलात प्रवेश दिला जाईल.

सराव झाल्‍यानंतर गर्दी न करता वेळेत संकुल परिसरातुन बाहेर पडावे. संकुलातील प्रवेश व वापराबाबतच्‍या अटी संकुलाच्‍या प्रवेशद्वाराजवळ व दर्शनी भागात लावण्‍यात आलेले आहेत.

त्‍याचे अवलोकन होवून त्‍यानुसारच खेळाडु व नागरिकांनी शिस्‍तीचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन श्री. शेखर पाटील, जिल्‍हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe