न्यूयॉर्क : बालपणी वायू प्रदूषणाला तोंड देणाऱ्या मुलांमध्ये किशोरावस्थेत नैराश्य, आत्ममग्नता आणि अन्य मानसिक आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. तीन ताज्या अध्ययनांतून हा खुलाला झाला आहे.
‘एन्वायर्नमेंटल हेल्ष पर्सेपेक्टिव्स’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनात असे दिसून आले की, कमी कालावधीसाठी वायू प्रदूषणाच्या विळख्यात येणाऱ्या मुलांमध्ये मुलांमध्ये मानसिक समस्या एक ते दोन दिवसांनंतर उद्भवू शकतात.
अमेरिकेतील सिनसिनाटी युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांसह अन्य संशोधकाना असे दिसून आले की, मागासलेल्या भागांतील मुलांमध्ये वायू प्रदूषणाचा परिणाम सर्वात जास्त होऊ शकतो व खासकरून त्यांच्यामध्ये आत्ममग्नता व आत्महत्येची प्रवृतीसारखे आजार जास्त असू शकतात.
सिनसिनाटीतील बाल रुग्णालयाचे कोल ब्रोकॅम्प यांनी सांगितले की, या अध्ययनात पहिल्यांदाच बाहेरच्या वायू प्रदूषणाची पातळी व मुलांमधील आत्ममग्नता व आत्महत्येची प्रवृती यांसारखे मानसिक आजार यांच्यात संबंध दिसून आला.
ब्रोकॅम्प यांनी सांगितले की, या अध्ययनाच्या पुष्टीसाठी आणखी अध्ययनाची गरज आहे. ज्या मुलांमध्ये मानसिक आजारांशी संबंधित संकेत दिसत असतील, ते रोखण्यासाठी हे अध्ययन सहाय्यक ठरू शकते. वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा घटक वाहतूककोंडीमुळे होणारे प्रदूषण आहे. वाहतूककोंडीमुळे मुलांमध्ये तणाव चिंतेची समस्या वाढत आहे.