ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाच्या आराक्षणाला शिवराष्ट्र सेना पक्षाचा पाठिंबा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- सध्या महाराष्ट्रभर विविध समाज हे आरक्षाणासाठी आंदोलन करत आहेत. त्यात प्रामुख्याने मराठा समाजाच्या आराक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. त्याचबरोबर ओबीस समाजही रस्त्यावर उतरत आहेत.

त्या अनुषंगाने विविध आंदोलनही होत आहेत. परंतु हे सर्व थांबून ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवराष्ट्र सेना पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जाहीर केले. शिवराष्ट्र सेना पक्षाची नुकतीच बैठक संपन्न झाली.

या बैठकित विविध विषयांवर चर्चा होऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भुमिका स्पष्ट केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, भैरवनाथ खंडागळे, राधाकिसन कुलट, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विजय पितळे, सौ.रत्ना नवसुपे आदि उपस्थित होते मराठा समाजास शैक्षणिक व नोकर्‍याच्या ठिकाणी आरक्षण मिळाल्यास समाजातील ज्यांच्याकडे बुद्धी कौशल्य आहे,

परंतु आरक्षणामुळे त्याचा लाभ त्यांना मिळत नाही, अशांना आरक्षणाने फायदा होईल. त्याच बरोबर मराठा समाजातील अनेक होतकरु तरुण केवळ आरक्षणामुळे मागे राहिले आहेत. हा त्यांच्यावरील अन्याय दूर होईल. काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना महाआघाडी सरकार बरोबरच इतरही पक्ष मराठा समाजाच्या आराक्षणास अनकुल आहेत.

परंतु सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुन कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशा स्वरुपाचे आरक्षण मराठा समाजास देण्यात यावी. परिणामी सध्या सुरु असलेले मोर्चे, आंदोलने थांबून जो पोलिस व प्रशासनावर ताण पडत आहे तो तणाव निर्माण होणार नाही.

प्रत्येक समाजात सलोख्याचे वातावरण राहील. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या शिक्षण, व्यवसाय यांनाही चालना मिळून राज्य प्रगतीपथवर राहील, असा विश्‍वास शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment