अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जिल्हा पोलीस दलात बदल्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. नुकतेच कर्जत पोलीस ठाण्याचा पदभार चंद्रशेखर यादव यांच्या हाती सोपविण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांची कर्जतहून अहमदनगरच्या नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर चंद्रशेखर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यादव यांनी यापूर्वी सेवाग्राम, वर्धा शहर, स्थानिक गुन्हे शाखा इंदापुर, भिगवण, बारामती येथे काम केलेले आहे. बारामती येथे सेवेत असताना गुन्हे शोध मोहिमेमध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलेले आहे.
बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, शिक्रापूर, जेजुरी आदी ठिकाणी जबरी चोऱ्या, खून, दरोडे टाकणाऱ्यांना त्यांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करून अनेक गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
कर्जत शहरातील वाहतुकीची समस्या, राशीन, मिरजगाव आदी भागात मोठ्या प्रमाणावर चालणारे अवैध धंदे रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस निरीक्षक यादव यांच्यासमोर आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com