महत्वाची बातमी ! तुमच्याकडून झाली ‘अशी’ चूक तर रेशन कार्ड लगेच होणार रद्द

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब लोकांना भरपूर अन्न मिळावे यासाठी सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली जेणेकरून जर एखादी व्यक्ती इतर राज्यात गेली तर तिथेही त्यांना सहज रेशन मिळेल.

रेशन कार्ड सिस्टम अंतर्गत, गरजू लोकांना धान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो, म्हणून वेळोवेळी व्यावहारिक कारणांमुळे ते आपल्या नियमातही बदल करतात. आता नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने तीन महिन्यांपासून रेशन कार्ड वापरला नसेल आणि धान्य भरले नसेल तर तो व्यक्ती सक्षम आहे असे गृहित धरले जाईल.

आणि त्याला रेशन कार्डची आवश्यकता नाही, म्हणून त्याचे रेशन कार्ड रद्द होईल. दरम्यान सलग 3 महिने ज्यांनी अन्नधान्य घेतले नसेल ते आता त्यांचे पोट भरण्यासाठी सक्षम असल्याचे ग्राह्य धरुन त्याचा फायदा इतरांना देण्यासाठी वळवला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.

याच्या अंमलबजावणीला उत्तर भारतातील बिहार, मध्यप्रदेश या राज्यात सुरूवात झाली आहे. त्याचबरोबर असेदेखील सांगण्यात येत आहे. याबाबत उत्तर प्रदेशातही एक रिपोर्ट बनवण्याचे आदेश देण्यात आले आहे. सरकार हा रिपोर्ट पाहून पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या योजनेनुसार, पूर्ण देशात 31 मार्च 2021 पर्यंत वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना लागू केली जाणार आहे. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत आता 81 कोटी लाभार्थ्यांना त्यांचा फायदा मिळत आहे. देशातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये राष्ट्रीय पोर्टेबिलिटी सुविधा म्हणजेच वन नेशन वन रेशन कार्ड लागू झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment